पर्यटनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून ३६ विशेष गाड्यांचे नियोजन, पहा संपूर्ण वेळापत्रक…

133

डिसेंबर महिन्यामध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी, पनवेल/पुणे-करमळी दरम्यान विशेष शुल्कासह ३६ साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आहे.

( हेही वाचा : हा १९६२चा नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भारत आहे; अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा चीनला गर्भित इशारा)

या हिवाळी विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे…

(१) लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी द्वि-साप्ताहिक विशेष (१६)

  • 01459 द्वि-साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १९.१२.२०२२ ते ११.१.२०२३ (८ सेवा) दर सोमवार आणि बुधवारी २२.१५ वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल.
  • 01460 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दि. २०.१२.२०२२ ते १२.१.२०२३ (८ सेवा) दरम्यान दर मंगळवार आणि गुरुवारी ०९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.
  • थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि.
  • संरचना : एक प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित आणि दोन जनरेटर व्हॅन.

(२) पनवेल – करमळी साप्ताहिक विशेषांक (१०)

  • गाडी क्रमांक 01447 साप्ताहिक विशेष पनवेल दि. १७.१२.२०२२ ते दि. १४.१.२०२३ (५ सेवा) दर शनिवारी २२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता करमळी येथे पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01448 साप्ताहिक विशेष गाडी दि. १७.१२.२०२२ ते १४.१.२०२३ (५ सेवा) दर शनिवारी ०९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी २०.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल.
  • थांबे : रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
  • संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान द्वितीय श्रेणी.

(३) पुणे – करमळी साप्ताहिक विशेष (१०)

  • गाडी क्रमांक 01445 साप्ताहिक विशेष पुणे येथून दि. १६.१२.२०२२ ते १३.१.२०२३ (५ सेवा) दर शुक्रवारी १७.३० वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01446 साप्ताहिक विशेष दि. १८.१२.२०२२ ते १५.१.२०२३ पर्यंत (५ सेवा) करमळी येथून दर रविवारी ०९.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.३५ वाजता पोहोचेल
  • थांबे : लोणावळा, कल्याण पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
  • संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण : विशेष ट्रेन क्र. 01445 साठी बुकिंग विशेष शुल्कावर आधीच उघडले आहे आणि विशेष गाड्या क्रमांक 01446, 01447/01448 आणि 01459/01460 विशेष शुल्कासह दि. १६.१२.२०२२ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.coc.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

संबंधित थांब्यांवरील या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.