मंदौस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात थंडीला ब्रेक मिळाला आहे. बदलापूर आणि नाशिक येथे अवकाळी पावसाचे आगमन झालेले असताना गुरुवारी पहाटे मुंबई व ठाण्यातही पावसाचा शिडकावा पाहायला मिळाला. मात्र सूर्योदयापूर्वीच पावसाचे शिडकावे गायब झाल्याने प्रभातफेरी किंवा कार्यालयीन वेळा गाठण्यासाठी सकाळी बाहेर पडलेल्यांना मात्र अवकाळी पाऊस अनुभवता आला नाही.
गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास मुंबईत कुर्ला तर ठाण्यात मुंब्रा तसेच भिवंडी परिसरानजीक पावसाचे शिडकावे प्रत्यक्षदर्शींना अनुभवायला मिळाले. मात्र काही मिनिटांसाठीच हे पावसाचे शिडकावे सुरु होते. शि़डकाव्यांमुळे तापमानात काहीच फरक पडला नाही. मुंबईत थंडीचा प्रभाव नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि तापमानवाढीतच मुंबईकरांचा दिनक्रम सुरु ठेवावा लागणार आहे. प्रत्यक्षात राज्यात सोमवारपासून पुन्हा थंडीला सुरुवात होईल. त्याचदरम्यान, मुंबईत किमान तापमान खाली सरकायला सुरुवात होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिका-यांनी दिली.
( हेही वाचा: मागेल त्याला पाणी, पण फूल विक्रेत्यांना नाही! माटुंग्यातील फुल विक्रेत्यांचे पुष्पहार पाण्याअभावी कोमेजतात )
Join Our WhatsApp Community