जगाच्या चिंतेत भर; DNA बदलून चीन तयार करतोय हायब्रीड सैन्य?

119

सध्या जीन एडिटींग तंत्रज्ञानाची खूप चर्चा आहे. पण याबाबत बहुतेक लोकांना सविस्तर माहिती नाही. जीन एडिटिंग असे तंत्रज्ञान आहे. ज्यामध्ये नैसर्गिक रचनांमध्ये बदल केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानामुळे डीएनएमध्ये बदल केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाद्वारे डीएनएमधील काही गोष्टी काढून टाकल्या जाऊ शकतात किंवा अनावश्यक गोष्टी त्यामध्ये वाढवल्या जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तपणे जीन एडिटिंगवर काम करत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन चीन युद्धामध्ये इतर देशांवर वरचढ ठरु शकतो. DNA मध्ये बदल करुन चीन हायब्रीड सैनिक बनवत असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

काय आहे जीन एडिटिंग?

जीन ए़डिटिंगला जीनोम एडिटिंग असेही म्हणतात. जीन एडिटिंग म्हणजे मानवी गुणसूत्रांमधील बदल. मानवी शरीरात जनुकांचा एक घटक असतो, याला जीन्स म्हणतात. जीन्सच्या समूहाला गुणसूत्र म्हणतात. गुणसूत्र ही सजीवांच्या शरीरातल्या पेशींमध्ये आढळणारी डीएनए आणि प्रथिमांची संघटित संरचना आहे. या नैसर्गिक संरचनेत बदल करणे म्हणजे जीन एडिटिंग. जीन एडिटिंगमध्ये डीएनएमधील गुणसूत्र हटवली जातात किंवा वाढवली जातात.

जीन एडिटिंगद्वारे संकरित प्रजाती निर्माण करण्याचा प्रयत्न

जगातील अनेक प्राण्यांवर जीन एडिटिंग तंत्रज्ञानाची चाचणी करण्याची तयारी सुरु आहे. गरज असेल तेव्हा या तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रजाती वापरल्या जातील. जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर केवळ प्राण्यांवरच नाही तर वनस्पतींवरही करुन नवीन हायब्रिड म्हणजे संकरित प्रजाती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

( हेही वाचा: Coastal Road Project: अनेक वर्षांपासून सुरु असलेला वाद मिटला; वरळीतील समुद्रात दोन खांबांमधील अंतर 120 मीटर ठेवण्याचा निर्णय )

चीनमुळे वाढली जगाची चिंता

दरम्यान, जीन एडिटिंगबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देश एकमेकांवर आरोप करत आहेत की, काही देश त्यांच्या सैनिकांवरही जीन एडिटिंगचा वापर करत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये असे अनेक आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दोन वर्षांपूर्वी सांगितले होते की, चीन आपल्या सैनिकांवर जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा करत आहे, तर ब्रिटननेही या दाव्याला समर्थन दिले होते. चीन महासत्ता बनवण्यासाठी आपल्या सैनिकांचे डीएनए बदलत असल्याचा आरोप ब्रिटनने केला होता. दरम्यान, याबाबत कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.