दिल्लीमधील द्वारका येथे 17 वर्षे वयाच्या शाळकरी मुलीवर फेकलेल्या अॅसिडची हल्लेखोरांनी फ्लिपकार्टवर ऑनलाइन खरेदी केली होती, हे त्यांच्या चौकशीतून उघड झाले आहे. याप्रकरणी फ्लिपकार्टला तसेच अॅसिडची किरकोळ विक्री करणा-या अॅमेझाॅनलाही दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
काही वर्षांपूर्वी अॅसिड हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने अॅसिडच्या किरकोळ विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. तरीदेखील हल्लेखोरांना अॅसिड कसे उपलब्ध झाले याची व हल्ल्याची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी विविध संघटना व नेत्यांनी केली होती.
( हेही वाचा: महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी, धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करा – हिंदुत्वनिष्ठ संघटना )
Join Our WhatsApp Community