रेल्वे स्थानकांवर ट्रेन सुटण्याच्या १ तास आधी पोहोचा; प्रवाशांसाठी जारी केल्या विशेष सूचना

204

तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. विमानतळ नियमांप्रमाणेच आता प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरही एक तास आधी पोहोचावे लागणार आहे. नियोजित ट्रेन सुटण्याच्या आधी एक तास प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर पोहोचावे असा सल्ला रेल्वे व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये अनेकदा गाड्यांच्या साखळ्या ओढण्याचे प्रमाण वाढल्याने रेल्वे प्रशासनाने या सूचना दिल्या आहेत.

( हेही वाचा : ‘या’ प्रकरणात Flipkart आणि Amazon ला दिल्ली पोलिसांनी बजावली नोटीस)

ट्रेनमध्ये चेन खेचण्याचे प्रमाण वाढले 

महत्त्वाच्या शहरांमध्ये अलिकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी वेळेत रेल्वे स्थानकावर पोहोचत नाहीत. परिणामी गाड्यांमध्ये चेन खेचण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. यामुळे रेल्वे व्यवस्थापनाकडून प्रवाशांना नियोजित ट्रेनच्या एक तास आधी रेल्वे स्टेशनवर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकावर १ तास आधी पोहोचा

पुणे विभागात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान रेल्वेमधील चेन खेचण्याच्या १ हजार १६४ घटना घडलेल्या आहेत. यात ९१४ प्रवाशांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये प्रवाशांना ८० हजारांपर्यंत दंडही आकारला गेला आहे तसेच चेन खेचल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. त्यामुळे चेन खेचून दंड भरण्याची वेळ ओढवून घ्यायची नसेल तर प्रवाशांनी एक तास आधीच रेल्वे स्टेशनवर पोहोचावे अशा सूचना रेल्वे प्रशासनाने केलेल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.