मध्य रेल्वे अंतर्गत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. या भरतीमार्फत तब्बल २ हजार ४२२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी १० वी पास उमेदवार सुद्धा अर्ज दाखल करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज दाखल करायचा आहे ते मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाईट rrccr.com वर अर्ज भरू शकतात. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया १५ डिसेंबर २०२२ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२३ आहे.
( हेही वाचा : रेल्वे स्थानकांवर ट्रेन सुटण्याच्या १ तास आधी पोहोचा; प्रवाशांसाठी जारी केल्या विशेष सूचना)
किती आहेत जागा?
मुंबई क्लस्टर (MMCT)- १ हजार ६५९ जागा
भुसावळ क्लस्टर – ४१८ जागा
पुणे क्लस्टर – १५२ जागा
नागपूर क्लस्टर – ११४ जागा
सोलापूर क्लस्टर – ७९ जागा
वयोमर्यादा
या पदांसाठी उमेदवाराचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असणे आवश्यक असणार आहे.
अशी होणार निवड
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे करण्यात येणार आहे. व्यापारातील आयटीआय गुणांसह १० वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
अटी व नियम जाणून घ्या…
- पदाचे नाव – अप्रेंटीस
- पदसंख्या – २ हजार ४२२
- नोकरी ठिकाणी – मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर
- वयोमर्यादा – १५ ते २४ वर्षे
- अर्ज शुल्क – १०० रुपये
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२३
- अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com