गोवरच्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र कोणत्या स्थानी ? केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दिली माहिती

181

देशभरात सप्टेंबर महिन्यापासून गोवरबाधितांचे रुग्ण वाढू लागले आहेत. या वाढत्या केसेसमध्ये बिहार, झारखंड खालोखाल महाराष्ट्र राज्यात गोवरबाधितांची संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्राचा देशभरात वाढत्या गोवरच्या केसेसच्या आकडेवारीत तिसरा क्रमांक लागला आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात गोवर-रुबेलाच्या लसीकरणाची गती मंदावल्याची कबुली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर वीणा धवन यांनी दिली. विलेपार्ले येथे गोवर-रुबेला लसीकरणाबाबत केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य विभाग तसेच युनिसेफच्यावतीने प्रसारमाध्यमांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यशाळेला ऑनलाईन माध्यमातून हजेरी लावणा-या डॉक्टर वीणा धवन यांनी वाढत्या गोवरच्या साथीमागील कारणही नमूद केले. गोवर-रुबेला नियंत्रणासाठी लसीकरण हा रामबाण उपाय असल्याची माहिती डॉक्टर वीणा धवन यांनी दिली.  कोरोना महामारीच्या काळात देशभरातील आरोग्य अधिकारी कोरोना नियंत्रणाच्या कार्यक्रमांत मग्न होते. या कारणामुळे गोवर-रुबेला लसीकरण मोहिम मागे सरल्याची कबुली डॉक्टर वीणा धवन यांनी दिली. बिहार, झारखंड, महाराष्ट्र राज्यात वाढत्या गोवरच्या केसेस चिंतेची बाब असल्याचेही त्या म्हणाल्या. केवळ गोवरची लागण झाल्यामुळे मृत्यू होतो, याबाबत डॉक्टर धवन यांनी खंडन केले. मृत्यूच्या जाळ्यातून वाचलेल्या रुग्णांना कित्येकदा बहिरेपणा येण्याचीही भीती डॉक्टर धवन यांनी व्यक्त केली.
गोवरबाधितांमधील मृत्यूचे प्रमुख कारण –
  • न्यूमोनिया
  • शरीरातील पाणी कमी होणे
  • कानातून पस येणे
  • श्वसनाचा त्रास होणे

पाच वर्षांखालील मुलांना गोवरचा विळखा

देशभरात कोरोना काळात जन्मलेली मुले सध्या गोवरच्या विळख्यात अडकल्याचे निरीक्षण केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिका-यांनी नोंदवले. देशभरात पंधरावयोगटापर्यंतही गोवरचे रुग्ण आढळले आहे. परंतु, त्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याची माहिती युनिसेफच्या अधिकारी डॉक्टर आशिष चौहान यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.