UPI पेमेंट फेल झाल्यानंतरही पैसे कापले गेलेत? कुठे कराल तक्रार?

159

भारतात अलिकडे डिजिटल पेमेंट प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. UPI पेमेंटद्वारे पैसे ट्रान्सफर करणे अगदी सोपे झाले आहे. या संपूर्ण यंत्रणेचे नियंत्रण रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (RBI) हाती आहेत. डिजिटल पेमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खात्यातून पैसे वजा होतात परंतु Transaction पूर्ण झालेले दाखवले जात नाही. त्यामुळे अनेकजण त्रस्त होतात परंतु आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचेही ऑनलाईन किंवा UPI पेमेंटचे Transaction पूर्ण झाले नाही तर तक्रार कुठे करायची याबाबत माहिती जाणून घ्या…

( हेही वाचा : ७०० दिवसांची प्रतीक्षा संपली…बांगलादेशविरुद्ध शुभमन गिलचे पहिले शतक! )

UPI APP मध्ये अशी करा तक्रार 

अनेकदा खात्यातून पैसे वजा झाल्यावरही व्यवहार पूर्ण होत नाही अशा परिस्थितीत काही लोकांना त्यांचे पैसे मिळतील की नाही अशी भीती वाटते. परंतु आता तुमचे पैसे तासाभरात परत आले नाहीत तर तुम्ही UPI APP मध्ये जाऊन तक्रार करू शकतात. यासाठी तुम्हाला पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर जावे लागेल. तुम्हाला raise dispute वर जावे लागेल. तुमची तक्रार raise dispute वर नोंदवा. यानंतरही तुमचे पैसे परत न आल्यास तुम्हाला बॅंकेशी संपर्क साधावा लागेल. परंतु एका महिन्याच्या आत बॅंकेकडून तुम्हाला कोणताही प्रतिसाद आला नाही तर तुम्ही RBI अंतर्गत तक्रार दाखल करू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.