मुंबईत गोवर आटोक्यात आणण्यासाठी तसेच संशयित रुग्णांना शोधण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी बांधकाम क्षेत्र तसेच रस्त्यावर राहणाऱ्या कामगारांच्या झोपड्यामध्ये सर्व्हेक्षणास सुरुवात केली आहे. मुंबईत ६६ टक्के गोवरबाधित रुग्ण स्थलांतरित समुदायात सापडले आहेत. संशयित रुग्णांवर वेळेवर उपचार करून गोवर आटोक्यात आणण्यास मदत होईल, असा विश्वास पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
( हेही वाचा : गोवरच्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र कोणत्या स्थानी ? केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दिली माहिती)
मुंबईत बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यातून मोठ्या संख्येने सध्या स्थलांतर सुरु आहे. कोरोनाकाळात स्थलांतरित समुदाय लघु उद्योग बंद पडल्याने आपापल्या गावी परतला होता. गेल्या दोन वर्षांत या समुदायात जन्मलेल्या मुलांचे गोवर लसीकरण झालेले नाही. या मुलांमध्येच मृत्यूचे प्रमाणही दिसून आले आहे. बांधकाम सुरु असलेल्या भागात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांमध्ये अजून तरी गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले नसल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने ही मोहीम राबवली जात असल्याचेही पालिका अधिकारी म्हणाले.
Join Our WhatsApp Community