जी- 20 देशांच्या प्रतिनिधींनी दिली कान्हेरी लेण्यांना भेट

142

जी-20 देशांच्या प्रतिनिधींची 13 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुंबईत परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या शेवटच्या दिवशी जी-20 प्रतिनिधींनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील प्रसिद्ध कान्हेरी लेण्यांना भेट देत या स्थळांची माहिती व इतिहास जाणून घेतला.

( हेही वाचा : गोवरच्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र कोणत्या स्थानी ? केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दिली माहिती)

बोरिवली जवळील साष्टी बेटाच्या अरण्यात कान्हेरी लेण्या आहेत. या लेण्यांचा इतिहास, ‘कान्हेरी’ या शब्दाचा उगम कशा प्रकारे झाला. या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते. हा परिसर अत्यंत शांत आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे त्यामुळे या भागात अनेक पर्यटक भेट देत असतात अशी माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाने यावेळी जी-20 च्या प्रतिनिधींना दिली.

जगभरातील प्रतिनिधींसाठी भारतीय शास्त्रीय संगीत कार्यक्रम

तुळशी तलाव येथे वन विभागाच्या निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी केंद्रीय पर्यटन विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तबला वादन, पखवाल वादन आणि शास्त्रीय संगीत सहभागी कलाकारांनी सादर केले. बासरी वादक देबो प्रिया,सुश्मिता चॅटर्जी, कलिनाथ मिश्रा आणि मृणाल मिश्रा यांनी भारतीय संस्कृतीतील विविध सुप्रसिद्ध गाण्यांवरती बासरी वादन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.