फिफा विश्वचषकाचे आयोजन यंदा कतारमध्ये करण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबरला होणार आहे. विश्वचषकात सर्वाधिक आकर्षण असते ते ट्रॉफीचे, तुम्हाला माहितीये का या ट्रॉफीमध्ये काय खास असते आणि याची किंमत किती आहे? जाणून घेऊया…
( हेही वाचा : महाविकास आघाडीच्या ‘विराट’ मोर्चाला भाजपाचा काऊंटर अॅटॅक)
जगातील सर्वात महागडी क्रीडा ट्रॉफी
फिफा विश्वचषक ट्रॉफी ही जगातील सर्वात महागडी क्रीडा ट्रॉफी आहे. याची किंमत जवळपास १४४ कोटी रुपये आहे. जेव्हा फिफा विश्वचषक तयार करण्यात आला तेव्हा त्याची किंमत $५०,००० होती. परंतु आता या ट्रॉफीची किंमत जवळपास १४४ कोटी रुपये आहे.
इटालियन कारागिर सिल्व्हियो गझानिगोने केली ट्रॉफीची रचना
या ट्रॉफीची रचना प्रसिद्ध मिलानो येथील इटालियन कारागिर सिल्व्हियो गझानिगो यांनी केली आहे. दोन मानवी आवृत्यांनी या ग्लोबला धरून ठेवले आहे. ही संपूर्ण ट्रॉफी १८ कॅरेट सोन्याने बनवली असून ट्रॉफीचे वजन ६.१ किलो आहे. तीन वेळा फिफा स्पर्धा जिंकल्यानंतर ब्राझीलला मागील ट्रॉफी ठेवण्याची परवानगी मिळाली होती यानंतर १९७१ मध्ये सिल्व्हियो या कलाकाराने प्रसिद्ध ट्रॉफी तयार केली आहे.
Join Our WhatsApp Community