गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेला म्हाडाच्या 2 हजार 521 घरांची सोडत

150

मुंबईतील 58 बंद गिरण्यांमधील 2 हजार 521 कामगारांना आता त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. कारण गिरणी कामगारांच्या 2 हजार 521 घरांची सोडत अखेर निघणार आहे. 1978 ते 80 या कालावधीत मुंबईत झालेल्या गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईतील 58 गिरण्या बंद पडल्या होत्या. यातील कामगारांना घरे मिळावी म्हणून अनेक आंदोलने विविध पक्षांनी केली होती.

म्हाडाकडे आता टाटा हाऊसिंग कंपनीने ठाणे जिल्ह्यातील रांजनोळीमध्ये 1244, विनय अगरवाल शिलोटर यांनी रायगड जिल्ह्यात रायचुरमध्ये बांधलेली 1019 तर सॅनव्हो व्हिलेज लि. ने कोल्हेमध्ये बांधलेली 258 घरे उपलब्ध झाली आहेत. यातील 6 सदनिका वगळता सर्व सदनिका 320 चौरस फुटांच्या आहेत.

( हेही वाचा: नौदलात दाखल होणार INS Murmugaon; जाणून घ्या या शक्तीशाली युद्धनौकेची वैशिष्ट्ये )

‘या’ तारखांना म्हाडाची सोडत

अर्ज करण्यासाठी 19 डिसेंबर ते 17 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. घरांसाठी गिरणी कामगारांचे पावणे दोन लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र यात अनेक कामगारांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीसाठीच्या प्रारुप यादीतील 12 हजार 981 अर्जदारांची यादी वेबसाईटवर टाकली आहे. यात एकापेक्षा अधिक अर्ज केलेल्यांनी तसेच दुबार नावे असलेल्यांनी म्हाडाकडे अर्ज करायचा आहे. कोणता एक अर्ज ग्राह्य धरायचा याबाबतचा विनंती अर्ज कामगारांना करावा लागणार आहे. त्यासाठी 19 डिसेंबर ते 17 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.