थंडी गायब होताच मुंबईच्या कमाल तापमानाने नोंदवला नवा विक्रम

130

ऐन डिसेंबरमच्या पंधरवड्यात थंडी गायब झालेली असताना मुंबईत शुक्रवारच्या कमाल तापमानाने नवा विक्रम नोंदवला. मुंबईतील कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. मुंबईतील कमाल तापमान शुक्रवारी देशभरातील सर्वात जास्त कमाल तापमान असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. गेल्या दहा वर्षांची डिसेंबर महिन्यातील कमाल तापमानाची विक्रमी नोंद पाहता तापमान थेट ३६ अंशाच्याही पुढे नोंदवले जात आहे. डिसेंबर महिना थंडीचा नव्हे तर उबदार होत असल्याचे दिसून येत आहे.

देशाच्या बहुतांश भागांत सध्या हुडहुडी देणारी थंडी गायब आहे. सध्या हिमाचल प्रदेश, गुजरात राज्यातील कच्छचा प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक तसेच तामिळनाडू राज्यातही कमाल तापमानात तीन ते पाच अंशांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात किमान तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली. सोमवारनंतर कमाल तापमानही तीस अंशापुढे जात होते. ३२-३४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले जात होते. शुक्रवारी कमाल तापमान थेट ३५.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

( हेही वाचा: गोवरची संख्या आटोक्यात येत असतानाच पुन्हा घडली दुर्घटना )

२०११ ते २०२० या वर्षांतील डिसेंबर महिन्यांतील कमाल तापमानाची विक्रमी नोंद पाहता कमाल तापमान ३६ अंशापर्यंतही पोहोचत असल्याचे नोंदवले गेले आहे. तर किमान तापमानही ११ ते १६ अंशापर्यंच्या दरम्यान नोंदवले जात आहे. त्याअगोदर मुंबईत डिसेंबर महिन्यात किमान तापमान १० अंशापर्यंत खाली सरकल्याच्या नोंदी आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.