अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह

277

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असून, आठवड्याभराच्या उपचारानंतर अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. एका खासगी वृत्त वाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असली तरी त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत.

तिसरी टेस्ट निगेटीव्ह आल्यावर डिस्चार्ज

सध्या अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असली तरी देखील तिसऱ्या चाचणीच्या रिपोर्टनंतर अमित शहा यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 2 तारखेला अमित शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. अमित शहा यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली होती. दिल्लीतल्या मेदांता रूग्णालयात गेल्या 7 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी, असं अमित शहा यांनी ट्विट करून सांगितलं होतं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.