Breaking news: घाटकोपरमध्ये रुग्णालयात भीषण आग; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

131

घाटकोपर पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या पारेख हाॅस्पिटलच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. हाॅस्पिटलच्या खाली असलेल्या हाॅटेलमध्ये ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना आणि रुग्णांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा रुग्णालयाचा परिसर असल्यामुळे तिथे गर्दी असते. रुग्णालयाच्या खाली असणा-या कॅंटीनमध्ये ही आग लागली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी आहेत.

( हेही वाचा: सहा दिवसांत समृद्धी महामार्गावरून धावली ५० हजारांहून अधिक वाहने )

 आगीने गंभीर स्वरुप केले धारण 

इमारतीमध्ये असलेल्या हाॅटेलमध्ये लागलेली आग वरच्या माळ्यावर असणा-या रुग्णालयापर्यंत ही आग पोहोचली आहे. साधारणत: 10 ते 15 मिनीटांपूर्वी लागलेल्या या आगीने गंभीर स्वरुप धारण केले असून, रुग्णालयाच्या इमारतीत आगीचे लोट पसरु लागले आहेत. दरम्यान, रुग्णालयाच्या इमारतीत एकूण किती नागिरक होते याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.