माय होम इंडिया – नॉर्थ ईस्ट पुरस्कार 2022 (Our North East India Award) 2022 स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे संपन्न झाला. सामजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार माय होम इंडियामार्फत दिला जातो. यावर्षी पालघर जिल्ह्यात आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन जवळपास १५० हून अधिक आदिवासी महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या सेवा विवेक सामाजिक संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला. सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक काळापासून पालघर जिल्ह्यात आदिवासी वनवासी महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.
( हेही वाचा : कॉंग्रेसने वीर सावरकरांचा अपमान केला तेव्हा मोर्चा का नाही काढला? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल)
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तेची गुबिन, प्रेमा खंडू कार्यक्रमाचे विशेष अतिथी रमेश पतंगे ( विचारवंत, लेखक , हिंदुस्तान प्रकाशनचे अध्यक्ष, सेवा विवेक सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते ) सुनील देवधर ( संस्थापक,माय होम इंडिया व राष्ट्रीय सचिव भाजपा) , अनुराधा पौडवाल( पद्मश्री पुरस्कार विजेत्या व प्रसिद्ध गायक), हरीश शेट्टी ( ऑल इंडिया प्रेसिडेंट- माय होम इंडिया ) श्रावण झा ( मॅनेजिंग ट्रस्टी ) या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सेवा विवेकला २०२२ चा वन इंडिया पुरस्काराने सेवा विवेक सामाजिक संस्थेला अनुराधा पौडवाल( पद्मश्री पुरस्कार विजेत्या व प्रसिद्ध गायक) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त होवा या हेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महिलांनी बांबू पासून उत्तम दर्जेदार प्रयावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.
उत्पादनांना वाढती मागणी
यावर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व कंदीलांना विदेशातही मागणी होती. तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर ,मोबाईल होल्डर , पात्राधर , फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार केल्या जातात.
या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे.
गेल्या वर्षी सेवा विवेकच्या कार्याचा माजी राष्ट्रपती व राज्यपालांनी कौतुक केले आहे. माजी राष्ट्रपतींद्वारे हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला. आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला य् संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत . यामुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
Join Our WhatsApp Community