अपघाताने केवळ सहा फूटाने जमिनीवर पडलेल्या २५ वर्षीय तरुणाचा अपघात जीवानीशी भोवल्याचे प्रकरण मुंबईत पश्चिम उपनगरात घडली. सहा फूटावरुन मेंदूवर पडल्याने अंतर्गत रक्त्रस्रावामुळे त्याला वाचवणे डॉक्टरांना दूरापास्त झाले. अखेरीस कुटुंबीयांनी आपल्या तरुण मुलाचे मूत्रपिंड, यकृत आणि दोन्ही डोळ्यांचे दान करत अवयवदानाचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.
मंगळवारी अपघाताने तरुण ६ फूटांवरुन जमीनीवर आपटला. मेंदूला जखमा झाल्याने त्याला दोन दिवस मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार केल्यानंतरही तरुणाच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा झाली नाही. दोन दिवसानंतर डॉक्टरांनी रुग्ण मेंदू मृत झाल्याचे कुटुंबीयांना कळवले. या अवस्थेत रुग्णाच्या शरीरातील अवयव हळूहळू निकामी होतात. अखेरिस रुग्णाचा मृत्यू होतो. मेंदू मृत अवस्थेत गेलेल्या मुलाकडून अवयवदान करता येईल, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. अखेरिस कुटुंबीयांनी अवयवदानाला संमती दिली. सेव्हन हिल्स रुग्णालयात अवयवदानासाठी आवश्यक परवाना नसल्याने तरुणाला पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिरानंदानी रुग्णालयात तरुणाच्या मृत्यूपश्चात दोन मूत्रपिंडे, यकृत आणि डोळ्यांचे दान करण्यात आले. या अवयवदानातून चार जणांना नवे आयुष्य मिळाले. तरुण वयात मुलगा गमावूनही कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने डॉक्टरांनीही त्यांचे आभार मानले.
( हेही वाचा: सहा दिवसांत समृद्धी महामार्गावरून धावली ५० हजारांहून अधिक वाहने )
Join Our WhatsApp Community