मुंबईत गोवर रुग्णसंख्या आता ४९० पर्यंत पोहोचली आहे. मुंबईत गोवरचे हॉटस्पॉट ठरलेल्या गोवंडीत आता रुग्णसंख्या स्थिरावत असताना कुर्ला परिसरात वाढणारी गोवरच्या रुग्णांची संख्या पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
( हेही वाचा : हल्लाबोल महामोर्चाला आघाडीच्या ‘या’ नेत्यांची पाठ )
कुर्ला पश्चिम आणि पूर्व परिसरात तसेच चांदिवलीतही गोवरचे रुग्ण सापडले आहेत. या भागाचा समावेश एम पूर्व वॉर्डमध्ये होतो. या परिसरात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने सुरु असल्याचा दावा पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी केला. आठवड्याच्या शेवटी आता रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्याही आता हळूहळू वाढू लागली आहे. शनिवारी ३४ गोवरबाधित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज दिला गेला, तर ३७ रुग्ण गोवरच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले. सध्या संपूर्ण मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही आहे. रुग्णसंख्या स्थिरावली असली तरीही लसीकरणासाठी अजूनही स्थलांतरीत समूदायाकडून नकार येत असल्याची बाब पालिका अधिका-यांनी मांडली.
Join Our WhatsApp Community