मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात विविध संवर्गात कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहे. डाटा ऑपरेटर, एक्स रे टेक्निशियन, अधि परिचारिका, बहुउद्देशीय कामगार, सुतार, प्लंबर, ए.सी टेक्निशियन, इलेक्ट्रीशियन, वायरमन कम लिफ्टमन आणि इलेक्ट्रीकल हेल्पर आदी पदे भरी जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर असून या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराने नायर दंत रुग्णालयात आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत प्राप्त होतील याप्रमाणे सादर करावे अशाप्रकारचे आवाहन नायर रुग्णालय दंत महाविद्यायालयाने केले आहे.
( हेही वाचा : भाजप म्हणतंय, दादा, नाना जागे व्हा!)
अर्जांची योग्य छाननी करून शिक्षण, अनुभव व वय आदी बाबींचा विचार करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल, असे नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी स्पष्ट केले आहे. तसेच याबाबतचे सर्व अधिकार हे दंत महाविद्यालय राखून ठेवत असल्याचे नमुद प्रसिध्द जाहिरातीत नमूद केले आहे.
डाटा ऑपरेटर : एकूण पदे ५
- शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण, मराठी व इंग्रजी टंकलेखन उत्तीर्ण,
- वयाची अट : १८ ते ३८ वर्ष
एक्स रे टेक्निशियन : १ पद
- शैक्षणिक अर्हता : बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा क्ष किरण विषयातील बीपीएमटी हा पूर्णवेळ ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम व सहा महिन्यांची इंटर्नशीप,
- वयाची अट : १८ ते ३८ वर्ष
अधिपरिचारीका : ४ पदे
- शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग अधिक मिडवायफरी डिप्लोमा धारक असावा कंवा साडेतीन वर्षाँचा कालावधी पूर्ण झालेला अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा तसेच उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा
- वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
बहुउद्देशीय कामगार : १२ पदे
- शैक्षणिक अर्हता : इयत्ता आठवी उत्तीर्ण असावा, मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता यावी
- वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
सुतार (कारपेंटर) : १ पद
- शैक्षणिक अर्हता: आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा त्याबाबतचा अनुभव असल्यास प्राधान्य
- वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
नळ कारागीर (प्लंबर) : १ पद
- शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा त्यासंदर्भातील अनुभव असल्यास प्राधान्य
- वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
एसी टेक्निशियन : १ पद
- शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्ल्यूडी परवाना बंधनकारक
- वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
इलेक्ट्रीशियन : १ पद
- शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्लूडी परवाना बंधनकारक
- वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
वायरमन कम लिफ्टमन
- शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्लूडी परवाना बंधनकारक
- वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
इलेक्ट्रीकल हेल्पर
- शैक्षणिक अर्हता : किमान आठवी पास व विद्युत कामाचा अनुभव असणे आवश्यक, मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे
- वयाची अट : १८ ते ३८