नोकरीपेक्षा उद्योजक व्हा… असे का म्हणत आहेत प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर

157
  1. देशात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रत्येकाचा आर्थिक विकास होणे गरजेचे आहे. आपल्या देशात अजूनही बरीच आर्थिक विषमता आहे. आर्थिक विषमता दूर करायची असेल तर प्रत्येकाने उद्योजक व्हावे. उद्योजक होणे ही काळाची गरज असल्याचा सल्ला प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी दिला. शनिवारी दादर येथील आयईएस शाळेच्या सभागृहात संपन्न झालेल्या आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.  यावेळी उद्योजक दीपक घैसासही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

( हेही वाचा : कॉलेज विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या)

आगामी पिढीला आर्थिक सुबत्ता मिळवायची असेल तर उद्योगधंद्याला प्राधान्य द्यायला हवे. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून महिला तसेच पुरुषांनाही यशस्वी उद्योजक बनवण्याचे आवश्यक ज्ञान मिळत असल्याबाबत त्यांनी कौतुकही केले. या व्यासपीठाच्या माध्यमातून केवळ शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागांतही उद्योजक वाढण्यास मदत होईल, अशी आशा डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागांत उद्योजक निर्माण झाल्यास शहरी व ग्रामीण भागांतील आर्थिक विषमतेची दरी बुजवण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

उद्योजक दीपक घैसास यांनीही डॉ. काकोडकर यांच्या मताशी सहमती दर्शवत सध्या उद्योगात मोठ्या संख्येने नोकरदार माणसे वळू लागल्याची माहिती दिली. लॉकडाऊन काळात नोकरी गमावलेल्या कित्येकांनी उद्योगाला सुरुवात केली. नोकरदार मंडळी आता उद्योगक्षेत्रात रमल्याचे पहायला मिळते. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी योग्य संधी साधा, माहितीचा सूयोग्य स्त्रोत वापरा, माहिती योग्य पद्धतीने उद्योगव्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी वापरा, असा सल्ला दिपक घैसास यांनी दिला. यावेळी १७ उद्योजकांना वेगवेगळ्या पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमाला आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मीनल मोहाडीकर तसेच त्यांची कन्या मधुरा मोहाडीकर यांनीही उपस्थिती लावली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.