देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची अशीही पर्वतावर साफसफाई मोहीम

163

गुरुंच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांनी गिरनारचा पर्वत चढताना सफाईचे अभियान राबवत तब्बल ४५० पिशव्यांमधून कचरा गोळा केला. भक्तांकडून टाकल्या गेलेल्या कचऱ्यामुळे पर्वतावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. पर्वतावरील हा कचरा काढणे हे जिकरीचे काम असले तरी ‘आस गुरुदर्शनाची!जय शंकर भक्त परिवारा’तील ३७ गुरुबंधूंनी रोप-वेच्या मदतीने येथील कचरा गोळा करत त्यांची नगरपालिकेच्या माध्यमातून विल्हेवाट लावली आहे.

( हेही वाचा : मुंबईत गोवरची रुग्णसंख्या ४९० पर्यंत)

गिरनारचा मेरूपर्वत चढताना आजूबाजूचा परिसर अनेक पाण्याच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, बिस्कीटची पाकिटे आदींमुळे कचरामय झाला होता. ही बाब मागील मार्च २०२२ मध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या ‘आस गुरुदर्शनाची !जय शंकर भक्त परिवारा’तील गुरुबंधूंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात येथील कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु त्यावेळी यंत्रसामृग्री पुरेशी नसल्याने ५० पिशव्या भरतील एवढा कचरा गोळा करून त्यांनी कमंडलू मंदिरापाशी असलेल्या जागेत ठेवला. परंतु हा कचरा खाली उतरवून त्याची विल्हेवाट लावली गेली नसल्याची बाब समोर येताच या सर्व गुरुबंधूंनी दुसऱ्या फेरीत पूर्ण तयारीनिशी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हजारो पायऱ्या असलेल्या या पर्वतावरील कचरा पिशवीत गोळा करून तो खाली पायऱ्या उतरुन आणणे शक्य नव्हते. त्यामुळे रोप -वेतून कचरा खाली आणण्यासाठी परवानगी मिळवणे आवश्यक होते. ही परवानगी युवा फाउंडेशन या संस्थेचे महेश भराई यांनी मिळवून दिली. त्यामुळे जवळपास ४५० च्यावर जमा झालेल्या कचऱ्याच्या गोण्या रोप वे मार्फत विनामूल्य खाली पायथ्याशी आणण्यात आल्या.

यावेळी गुजरात, जुनागढमधील श्री क्षेत्र कमंडलू मंदिरमधील समीर भाई, सर्व सेवेकरी गुरुबंधू, गोरक्षनाथ शिखरमधील परमपूज्य गुरू सोमनाथ बापू, त्यांचे शिष्य मंगलदास बापू, सुनील भाऊ, राम सेवालाल मंदिरातील परमपूज्य गुरू ब्रम्हानंद बापू, सेवक मिलन भाई, प्रेम भाई यांचेही आशिर्वाद व सहकार्य लाभले. सहकार या सेवेतमेहुल जानी, उर्मिल सोराथिया, भागीरथसिंह चुडासमा यांनी सहकार्य केले. तसेच स्थानिक परिसरातील प्रवास व सेवा यासाठी आमचे सारथ्य करणारे रिक्षाचालक जितू भाई यांनीही सहकार्य केल्याची माहिती जय शंकर भक्त परिवारातील गुरुबंधूंनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.