भारताने दृष्टिहीनांसाठी मंगळवारी आयोजित केलेल्या तिसऱ्या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. भारताने यापूर्वी नेपाळ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला होता, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
प्रथम गोलंदाजीचा करताना भारतीय संघाने बांगलादेशला 4 बाद 166 धावांवर रोखले. बांगलादेशचा कर्णधार आशिकुर रहमान आणि मोहम्मद आरिफ यांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली, तर भारतीय सलामीवीर टी दुर्गा राव आणि नकुल बरनायक यांनी 8.3 षटकात 95 धावा केल्या. भारताने 13.1 षटकात 3 विकेट गमावत 167 धावा केल्या.
पंतप्रधानांकडून भारतीय संघाचे अभिनंदन
नेत्रहिनांचा टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर संदेश जारी करत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संघाचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेचे ट्विट, आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर केले आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, आपल्या खेळाडूंचा संपूर्ण भारताला अभिमान आहे. या विजयाबद्दल आपल्या संघाचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community