महापुरुषांबाबत करण्यात येणारी आक्षेपार्ह वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांसाठी महाविकास आघाडीतर्फे हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पैसे वाटण्यात आले होते असा आरोप भाजपने केला आहे.
( हेही वाचा : महापालिकेच्या ‘या’ रुग्णालयात भरती : अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ डिसेंबर)
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पैसे वाटतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. मुंबईतील पत्रकार संघाजवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाजवळ मोर्चा सुरू असतानाचे दृश्य या व्हिडिओमध्ये आहे. “मविआ मोर्चात थोडीफार लोकं जमली ती सुध्दा अशा पध्दतीनं” असे ट्वीट केशव उपाध्येंनी केले आहे.
मोर्चाला पैसे वाटून लोकं आणली होती का? – केशव उपाध्ये
कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर पैसे का वाटप केले जाते याचा अभ्यास केला पाहिजे. मोर्चाला जी काही लोकं आली होती ती पैसे वाटून आणली होती का? याचा खुलासा कॉंग्रेसने करावा अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली. दरम्यान, पोलिसांच्या आकडेवारीनुसार या मोर्चात केवळ ६० ते ६५ हजार लोक सहभागी झाले होते अशी माहिती देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Communityमुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या कॅाग्रेस कार्यालयाजवळ आज मोर्चा सुरू असतानाचे दृश्य
आज मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीने…. pic.twitter.com/I7XvM6Wf0B— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 17, 2022