‘उद्धवसेने’च्या 40 टक्के मोठ्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांची ‘महामोर्चा’ला अनुपस्थिती, ‘हे’ कारण देत मारली दांडी!

137

महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी मुंबईत काढण्यात आलेल्या हल्लाबोल महामोर्चासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता असा दावा मविआच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात या मोर्चात केवळ काही हजारांमध्ये गर्दी असल्याची माहिती पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. अशातच उद्धवसेनेच्या औरंगाबादमधील ४० टक्के मोठ्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांनी ‘महामोर्चा’ला अनुपस्थिती दर्शवली.

‘हे’ कारण देत नेत्यांनी मारली दांडी! 

या ४० टक्के मोठ्या पदाधिकाऱ्यांनी कौटुंबिक कारण देत महाविकास आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्च्याला दांडी मारली. तर सामान्य कार्यकर्ते अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरातून किमान ५ हजार जणं मोर्च्याला जातील, अशी अपेक्षा असतना केवळ १५०० जणच या मोर्च्यात सहभागी झाले होते. यावेली बहुतांश जणांनी स्वखर्चाने प्रवास केला होता तर औरंगाबाद जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी म्हणाले, कोण आले नाही, याचा आढावा मी घेईन परंतु, अनेकांनी वैयक्तिक कारणे सांगून माझी परवानगी घेतली होती.

(हेही वाचा – महाविकास आघाडीच्या नेत्यांचा गर्दीचा दावा ठरला फोल; मोर्चात केवळ ६०-६५ हजार लोकांचा सहभाग)

कोणी सर्वाधिक दर्शविली उपस्थिती

महाविकास आघाडीच्या महामोर्च्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचेही समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा विरोधकांच्या उरात धडकी भरवणारा होता, असे मोर्च्यात सहभागी झालेल्यांनी सांगितले. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हुकूमशाही नव्हे तर शिवशाहीचे समर्थक होते, असा दावा हर्सूल येथील संजय हरणे यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.