थंडीच्या गैरहजेरीने मुंबईत कमाल तापमानात सतत वाढ होत आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचे कमाल तापमान हे देशातील सर्वात जास्त कमाल तापमान ठरले. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सियसवर पोहोचले तर शुक्रवारी कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सियसवर होते.
(हेही वाचा- ‘उद्धवसेने’च्या 40 टक्के मोठ्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांची ‘महामोर्चा’ला अनुपस्थिती, ‘हे’ कारण देत मारली दांडी!)
गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या तापमानवाढ जास्त दिसून येत आहे. राज्यात सगळीकडेच तापमानवाढ सुरु असतानाच कोकणातील कमाल तापमान तीन ते पाच अंशाने वाढल्याचे निरीक्षण भारतीय हवामान खात्याने नोंदवले आहेत.
देशातील सर्वात पहिल्या तीन कमाल कमाल तापमानवाढीच्या नोंदीत रत्नागिरी तिसऱ्या स्थानकावर पोहोचले. रत्नागिरी येथे शनिवारी कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सियसवर नोंदवले गेले. राज्यात तापमानवाढ सोमवारपर्यंत कायम राहिल. त्यानंतर हळूहळू कमाल आणि किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community