बापरे! एअरपोर्टवर महिला प्रवाशाच्या शरीरातून काढल्या तब्बल कोकेननं भरलेल्या ८२ कॅप्सूल अन्…

136

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गिनी देशातील एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या महिलेची माहिती मिळताच कस्टम अधिकाऱ्यांनी या महिलेला थांबवून चौकशी केली. महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या शरीरात ८२ कोकनने भरलेल्या कॅप्सूल असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. या घटनेने दिल्ली विमानतळावर एकच खळबळ माजली.

(हेही वाचा – राज्यात 7 हजारांहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! मतदान सुरू, सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचे उमेदवार रिंगणात)

कस्टम अधिकाऱ्यांना शंका येताच वैद्यकीय प्रक्रियेतंर्गत डॉक्टरांच्या देखरेखेखाली महिलेच्या शरीरातून या कोकेनच्या कॅप्सूल काढण्यात आले आहे. या कॅप्सूलची किंमत १५.३६ कोटी रूपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या महिलेविरूद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

माहितीच्या आधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेला पकडले ही महिला ग्रीन चॅनल पार करून इंटरनॅशलच्या दाराबाहेर पडण्यासाठी त्या दिशेने येत होती. महिलेने अंमली पदार्थाच्या कॅप्सूल गिळल्याचे चौकशीत अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर अधिकाऱ्यांनी तिला रूग्णालयात दाखल केले, या ठिकाणी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासात तिच्या शरीरात काही गोष्टी असल्याचे आढळून आले. त्यानंतर महिलेच्या शरीरातून ते कॅप्सूल हटवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि ती प्रक्रिया अनेक दिवस सुरू होती.

विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८२ कॅप्सूलमधूल एकूण १ हजार २४ ग्रॅम सफेद पावडरीचा चुरा बाहेर काढण्यात आला. त्याची चौकशी केली असताना ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्याची किंमत अंदाजे १५.३६ कोटी रूपये आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेविरूद्ध अंमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.