सावधान! तुमच्या फोनमध्ये ‘हे’ बदल झालेत? तर तुमचा फोन हॅक झालाय

158

सध्या डिजिटलायझेनचे युग असल्याने सर्वच लहान मोठे व्यवहार हे ऑनलाईन माध्यमातून आपण करतो. त्यामुळे सायबर क्राईमचे प्रकरणं देखील वाढल्याचे समोर आले आहे. हे डिजिटल व्यवहार करताना तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यताही सर्वाधिक असते. तुमचा फोन हॅक झाल्यावर अनेक बदल झाल्याचे बघायला मिळतात. हे बदल तुमचा फोन हॅक झाल्याचे सूचित करणारे असतात. या बदलांकडे बऱ्याचदा आपल्याकडून दुर्लक्ष केले जाते, मात्र हे दुर्लक्ष करणं मोठं नुकसानाचं कारण ठरू शकते.

(हेही वाचा – बापरे! एअरपोर्टवर महिला प्रवाशाच्या शरीरातून काढल्या तब्बल कोकेननं भरलेल्या ८२ कॅप्सूल अन्…)

तुम्ही जे इंटरनेटवर सर्च करता त्याच्याशी संबंधित पॉपअप तुम्हाला आपोआप दिसतात. पण एखादा स्मार्टफोन हॅक केला जातो. तेव्हा एक्स रेट केलेले पॉपअप दिसतात. ज्याच्याशी युजर्सचे कोणतेही कनेक्शन नसते. म्हणजे तुम्ही त्याच्याशी संबंधित काहीही सर्च केलेले नसते. जर तुमच्या फोनमध्ये असेच पॉपअप येत असतील तर तुम्ही ती गोष्ट कधीही सर्च केलेली नसेल तर सतर्क व्हा…कारण तुमच्या फोनमधील डेटावर कोणाचा तरी वॉच आहे, हे ते संकते आहेत.

तुमच्या फोनमध्ये ‘हे’ बदल झालेत?

  1. वापर कमी असतानाही इंटरनेट वेगाने संपत असेल तर सावध व्हा
  2. बॅटरी विनाकारण वेगाने संपत असेल तर सतर्क व्हा
  3. सेंटिग्स तपासून बघा, अँटिव्हायरस अॅपचा वापर करा
  4. तुमचा फोन नवीन असूनही स्लो सुरू असेल तर तेव्हा वेळीच सावध व्हा
  5. तुमच्या फोनवरून तुम्ही कॉल, मेसेज करू शकत नसाल, तर तुमचा डिव्हाईस हॅक झाल्याचे लक्षण आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.