मरिन ड्राईव्ह @१०७! मुंबईकरांच्या हक्काच्या जागेबद्दल काही रंजक गोष्टी…

183

मुंबईकरांच्या लाडक्या मरिन ड्राईव्हला १८ डिसेंबरला १०७ वर्ष पूर्ण होणार आहेत. मरिन ड्राईव्ह पाहिले नाही किंवा कॉलेजच्या जीवनात मरिन्सला फिरायला गेले नाहीत असे मुंबईकर आपल्याला क्वचितच आढळतील. अनेक सिनेमे, सिरियलचे शुटिंग सुद्धा या परिसरात होते अर्थात प्रत्येकाला या जागेची भुरळ पडलेली आहे. या मुंबईकरांच्या हक्काच्या जागेला १८ डिसेंबर २०२२ रोजी १०७ वर्ष पूर्ण झाली आहेत.

( हेही वाचा : बेस्टच्या एसी बसेस आणिक आगारात धूळखात )

ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुंबईची दमट हवा सहन होत नव्हती म्हणून ब्रिटश सरकारने १८ डिसेंबर १९१५ रोजी गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉईंट दरम्यान पाथ-वे बांधण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प पूर्ण होण्यास पाच वर्षे लागली. १९२० पासून हा परिसर मरिन ड्राईव्ह म्हणून नावारुपास आला.

१९२० साली बांधलेल्या मरिन ड्राईव्हला पहिल्या ७२ वर्षांत एकदाही डागडुजी करण्याची गरज लागली नाही.

मरिन ड्राईव्ह प्रकल्पात मराठमोळ्या इंजिनिअरचा महत्त्वाचा वाटा आहे. एन. व्ही. मोडक ( नानासाहेब मोडक) यांचा सांडपाण्याची व्यवस्था, टाऊन प्लॅनिंगमध्ये विशेष हातखंड होता. हा प्रकल्प सुद्धा त्यांच्या कल्पनेतून साकार झाला इंग्रज अधिकारी देखील मोडक यांच्या सल्ल्याप्रमाणे निर्णय घेत.

मरिन ड्राईव्ह प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट शापूरजी पालोनजी व भागोजी कीर यांना दिले होते.

गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉईंट हा संपूर्ण रस्ता आज मरिन ड्राईव्ह म्हणून प्रचलित असला तरी हा रस्ता आधी सोनापूर नावाने ओळखला जायचा.

संपूर्ण रस्त्यावर कोणत्या प्रकारचे दिवे लावायचे यासाठी १९५० मध्ये जनमत चाचणी घेण्यात आली होती त्यानंतर या संपूर्ण परिसरात पिवळ्या रंगाचे पथदिवे लावण्यात आले.

मरिन ड्राईव्हचा आकार इंग्रजी अक्षर C सारखा आहे. त्यामुळे दिवे लागल्यानंतर हा परिसर नयनरम्य दिसतो. म्हणूनच या रस्त्याला क्वीन्स नेकलेस असे नाव मिळाले.

लाटांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण परिसरात ६ हजार ५०० हून अधिक सीवॉल ट्रायपॉड्सचा वापर करण्यात आला.

आर्ट डेको शैलीच्या इमारतींमुळे मरिन ड्राईव्हच्या सौंदर्यात आणखी भर पडली. या इमारती १९३० नंतर बांधण्यात आल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.