फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मेस्सीची अर्जेंटिना आणि एम्बाप्पेच्या फ्रान्स या संघांमध्ये रंगणार आहे. फ्रान्सने मोरक्कोचा तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना ही लढत अटीतटीची असा अंदाज फुटबॉलप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अंतिम सामना लाईव्ह कुठे पहायला मिळेल, किती वाजता सुरू होईल? असे अनेक प्रश्न फुटबॉलप्रेमींना पडले असतील जाणून घेऊया याविषयीची संपूर्ण माहिती…
( हेही वाचा : एसटीतून सामान्य नागरिकांचा होणार ‘स्मार्ट’ प्रवास! मिळणार १० टक्के सवलत, फक्त करा ‘हे’ काम)
अंतिम सामना कुठे खेळवला जाणार?
कतारच्या दोहा लुसेल स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. लुसेल स्टेडियम हे सर्वात मोठे असून याठिकाणी सुमारे ८९ हजार प्रेक्षक एकत्र मॅच पाहू शकतात.
सामना केव्हा सुरू होणार?
अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील अंतिम सामना हा भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरू होईल.
अंतिम सामना LIVE कुठे बघता येईल?
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट्स १८ एचडी या चॅनेलवर केले जाईल. तसेच जिओ सिनेमा या APP वर सुद्धा तुम्ही फुटबॉल सामन्याचा आनंद घेऊ शकता.
Join Our WhatsApp Community