January 2023: नवीन वर्षात कोणते नियम बदलणार ? जाणून घ्या सविस्तर

144

येत्या काही दिवसात नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. 1 जानेवारीपासून बॅंकाशी संबंधित काही नियम नववर्षात बदलणार आहेत. ते जाणून घेऊया.

1 जानेवारी 2023 पासून बॅंक लाॅकरशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या सुधारित अधिसुचनेनुसार, बॅंका लाॅकरच्या बाबतीत मनमानी करु शकणार नाहीत आणि ग्राहकाचे नुकसान झाल्यास त्यांची जबाबदारी सोडू शकणार नाहीत. तसेच, एसबीआय (SBI) पीएनबीसह (PNB) इतर बॅंकांनी ग्राहकांना एसएमएसद्वारे नवीन नियमांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. पीएनबी ग्राहकांना मिळालेल्या संदेशात असे म्हटले आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन लाॅकर एॅग्रीमेंट 31 डिसेंबर 2022 पूर्वी लागू केला जाणार आहे.

लाॅकर एक्सेसबदद्ल SMS आणि EMIAL सूचना

लाॅकरमध्ये अनधिकृत एक्सेस केल्यास दिवस संपण्यापूर्वी बॅंका ग्राहकांचा नोंदणीकृत मेल एड्रेस आणि मोबाईल क्रमांक तारीख, वेळ आणि काही आवश्यक गोष्टींबद्दल माहिती देतील.

( हेही वाचा: महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या ताब्यात; बेळगावात जमावबंदीचे आदेश )

फीमध्ये बदल

तसेच, SBI च्या मते, बॅंक लाॅकरचे शुल्क क्षेत्रफळ आणि लाॅकरच्या आकारानुसार, 500 ते 3 हजार रुपयांपर्यंत असते. मोठी शहरे आणि महानगरांमधील बॅंका लहान, मध्यम, मोठ्या आणि अतिरिक्त मोठ्या आकाराच्या लाॅकरसाठी 2 हजार, 4 हजार, 8 हजार आणि 12 हजार रुपये वार्षिक आकारण्यात येतील.

‘या’ स्थितीत बॅंका देणार ग्राहकांना पैसे

RBIच्या नवीन मानकानुसार, बॅंकेच्या निष्काळजीपणामुळे लाॅकरच्या कोणत्याही वस्तूंचे नुकसान झाल्यास, बॅंकेला ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल.

‘या’ प्रकरणांत बॅंक नुकसान भरपाई देणार नाही

भूंकप, पूर, वादळ इत्यादी कोणत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे लाॅकरमधील सामग्रीचे नुकसान झाल्यास, बॅंक त्याची भरपाई करण्यास जबाबदार राहणार नाही. तसेच, ग्राहकाच्या स्वत:च्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असेल तर बॅंक ग्राहकांना कोणतेही पैसे देणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.