पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विविध मागण्यांसाठी आज, सोमवारी पुण्यातील नवी पेठेत एमपीएससी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन सुरू असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
(हेही वाचा – मराठा समाज आक्रमक, राऊतांचे पोस्टर्स जाळून ‘स्वराज्य संघटने’चे शिवसेना भवनासमोर आंदोलन)
काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या?
राज्य सेवा पूर्व 2023 ची परीक्षा 4 जून रोजी असून त्यामध्ये लाखो विद्यार्थी ही परीक्षा देणार असून ही पूर्व परीक्षा पास होणे आव्हानात्मक असते. म्हणून राज्य सेवा पूर्व परीक्षा पास होणे विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असते. म्हणून पूर्वचा किमान 5-6 महिने अभ्यास होणे गरजेचा असल्याने वेळ मिळावा ही विद्यार्थ्यांची सामान्य मागणी आहे.
तर नवीन पॅटर्न 2025 ला लागू केला तर जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळतील, ज्यांना नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची आहे ते 2025 साठी तयारी करतील परंतु, पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकासान आहे. याबाबत शासनाने विचार करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासह विद्यार्थ्यांने अशीही मागणी केली की, अभ्यासक्रम जसाच्या तसा यूपीएससीचा कॉपी पेस्ट आहे. त्यामुळे एमपीएससीच्या मुलांना अजून कोणतेही संदर्भ साहित्य उपलब्ध नाही त्यामुळे यामध्ये सुधारणा करण्यात यावी.
Join Our WhatsApp Community