हिवाळी अधिवेशन: सीमावादावर गदारोळ,जाणून घ्या पहिल्या दिवसाच्या अधिवेशनातील रस्त्यापासून सभागृहापर्यंतच्या घडामोडी

142

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधकांनी गदारोळ केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. तर दुसरीकडे बेळगाव सीमेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घुसण्याचा प्रयत्न करण्यात केला.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात गोंधळाने झाली. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधी आमदारांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’ असे फलक लावून घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला आश्वासन दिले आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर सर्व पक्षांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

( हेही वाचा: ‘त्या’ वादग्रस्त फेक ट्विटचा शोध लागला; शिंदे- बोम्मई यांच्यात चर्चा, लवकरच होणार कारवाई )

मविआचे नेते कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात

बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली. त्यानंतरही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेळगावमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये कलम 144 लागू केले आहे.

नुकतीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. यानंतर, गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांना शांतता राखण्याचा सल्ला दिला आणि सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाशी संबंधित प्रलंबित प्रकरणाचा निकाल येईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले. यानंतरही राज्यातील विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि अधिवेशनात गोंधळ घातला.

आदित्य ठाकरे संतापले

नॅनो आंदोलनाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे संतापले. ते म्हणाले की, नॅनो प्रकल्प नागपुरात आणा. कर्नाटकात निवडणुका आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्हे कर्नाटकात विलीन करण्याचे हे राजकारण आहे. गुजरातमध्येही निवडणुका होत्या, त्यावेळी महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पळवले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर हे सरकार काहीही बोलायला तयार नाही. या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी येऊन माझ्याशी चर्चा करावी असे आव्हान मी देतो, असे ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.