उद्योगपती एलाॅन मस्क यांनी खरेदी केल्यानंतर ट्वीटरमध्ये प्रचंड बदल झाले आहेत. आता भारतीय मायक्रोब्लाॅगिंग व्यासपीठ ‘कू’ ने ट्वीटरला आव्हान दिले आहे. ट्वीटरच्या वापरकर्त्यांना सर्व जुन्या ट्वीटसह ‘कू’ वर स्थलांतरित होण्याचे आवाहन कंपनीचे संहसंस्थापक व सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी केले आहे. ट्वीटरवर अनेक जणांचे खाते निलंबित होत आहेत. त्यामुळे बौद्धिक हत्या होऊ नयेत, म्हणून हा पर्याय दिल्याचे राधाकृष्ण यांनी सांगितले.
दोन दिवसांपासून ट्विटरने ‘कू’ चे खाते ब्लाॅक केले होते. त्यानंतर ‘कू’ ने ट्वीटरला टक्कर देण्याची तयारी सुरु केली. राधाकृष्ण तीव्र नाराजी व्यक्त करताना, एलाॅन मस्क यांना विचारणा केली होती. ‘कू’ चे खाते कशासाठी ब्लाॅक केले? आम्ही ट्वीटरशी स्पर्धा करतो म्हणून? ह कोणत्या जगात आपण राहत आहोत एलाॅन मस्क, असे ट्वीट राधाकृष्ण यांनी केले होते.
( हेही वाचा: हिवाळी अधिवेशन: सीमावादावर गदारोळ,जाणून घ्या पहिल्या दिवसाच्या अधिवेशनातील रस्त्यापासून सभागृहापर्यंतच्या घडामोडी )
राधाकृष्ण यांची मस्क यांच्यावर नाराजी
तुमचे खाते निलंबित करणे म्हणजे कल्पकता, विचार, संपर्क आणि अंतर्मनाशी असलेली पोहोच हरवून बसता, अशा शब्दांमध्ये राधाकृष्ण यांनी नाराजी व्यक्त केली. ट्वीटरवरील वापरकर्त्यांना जुन्या ट्वीटसह ‘कू’ वर स्थलांतरित होता येईल. मात्र, लाइक्स, रिप्लाय आणि रिट्विट या गोष्टी स्थलांतरित होऊ शकणार नाहीत.
- मार्च 2020 मध्ये कू लाॅंच केले होते.
- सर्वप्रथम कन्नड भाषेचा पर्याय होता.
- त्यानंतर इंग्रजी, हिंदी, मराठीसह 12 भाषांटा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला.
- ट्विटरखालोखाल ‘कू’ हे दुसरे सर्वात मोठे मायक्रोब्लाॅगिंग व्यासपीठ आहे.
- 275 दशलक्ष डाॅलर्स बाजारमूल्य
- नुकतेच चार नवे फिरर्स ‘कू’ ने लाॅंच केले आहेत.