फिफा विश्वचषक जिंकल्यावर मेस्सीने निवृत्तीचा निर्णय बदलला…

166

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विजयानंतर आता स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्तीचा निर्णय बदलला आहे. जगज्जेता म्हणून मला काही सामने खेळायचे आहेत असे मेस्सीने स्पष्ट केले असून वर्ल्डकपपूर्वी मेस्सीने हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा असेल असे सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते.

( हेही वाचा : ५ लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफत! पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून होईल मोठा फायदा )

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर अर्जेंटिनाने ४-२ असा विजय मिळवला. मला ही ट्रॉफी अर्जेंटिनाला घेऊन जायची आहे आणि इतर सर्वांसोबत याचा आनंद घेऊन पुढील काही सामने वर्ल्ड चॅम्पियन म्हणून खेळायचे आहे असे मेस्सीने स्पष्ट केले आहे.

३६ वर्षांनी अर्जेंटिना विजयी

अर्जेंटिनाच्या विजयाने लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार झाले आहे. यापूर्वी १९७८ आणि १९८६ मध्ये अर्जेंटनाने फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. २०१४ मध्ये वर्ल्डकप विजयाचे अर्जेंटिनाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते. यानंतर आता अर्जेंटिनाने ऐतिहासिक कामगिरी करत फ्रान्सचा पराभव केला आहे. या सामन्यात फ्रान्सचा खेळाडू एमबाप्पेने गोलची हॅट्रिक केली.

मेस्सीची ऐतिहासिक कामगिरी

अर्जेंटिना विजयासह मेस्सीने अंतिम फेरीत इतिहास रचला आहे. त्याने दोनदा गोल्डन बॉल जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. वर्ल्डकपमध्ये मेस्सीने सर्वोत्तम कामगिरीसाठी दोनदा गोल्डन बॉल जिंकला आहे. गोल्डन बॉल जिंकणारा मेस्सी हा एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये मेस्सीने गोल्डन बॉल जिंकला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.