नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपूरप्रमाणे नाशिकमध्ये आता डबलडेकर उड्डाणपूल होणार आहे. नाशिकसाठी २ हजार १०० कोटींचा निओ मेट्रो प्रकल्प मंजूर होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, सोमवारी दिली आहे. मेट्रोसाठी इलिव्हेटेड कॉरीडॉर अंतर्गत नाशिक रोड ते द्वारका चौक या मार्गावर नागपूरप्रमाणे डबल डेकर उड्डाणपुलाच्या सोळाशे कोटींच्या मार्गाला मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
(हेही वाचा – अमरावतीत एकाच दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, सात जणांना बेड्या)
इगतपुरी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांच्या लोकार्पण आणि कोनशिला अनावरण सोहळ्यात बोलत असताना ते म्हणाले, मेट्रो प्रकल्पात गंगापूर ते नाशिक रोड हा २० तर गंगापूर ते मुंबई नाका हा १० किलोमीटर असे दोन मार्ग असणार आहे. त्यातील गंगापूर ते नाशिक रोड या मार्गावरील नाशिक रोड ते द्वारका चौक या सहा किलोमीटर अतंरावर डबल डेकर मार्ग असणार आहे. जमिनीवर दोन, त्यावर दोन व उड्डाणपुलावर चार पदरी मार्ग असणार आहे. त्यावरून मेट्रो धावणार आहे. याशिवाय इंदिरानगरच्या संलग्न सर्व्हिसरोडचा अंडरपास आणि राणेनगर बोगद्याच्या संलग्न सर्व्हिस रोडचा अंडरपास वाढवण्याचे काम केले जाणार आहे.
नाशकात कार्यक्रमासाठी यापूर्वी आलो असताना मुंबई ते नाशिक महामार्गाच्या कामाची मागणी करण्यात आली होती. राज्याचा बांधकाममंत्री असताना मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक महामार्गाचे काम करण्याची इच्छा होती. मात्र अलयमेंट वादामुळे मुंबई नाशिक महामार्गाच्या कामाचा प्रश्न सुटला नव्हता. आता मात्र महामार्गांची कामे होत असल्याने शेतमालांच्या निर्यातीची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community