वीर सावरकरांच्या तैलचित्राविषयी बोलण्यास महाविकास आघाडीचा नकार

157

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे तैलचित्र कर्नाटकच्या विधानसभेत लावण्यात आले आहे. मात्र, त्यास कर्नाटक काँग्रेसने विरोध केला आहे. महाराष्ट्रात महापुरुषांच्या अवमानावरून राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना याविषयी विचारले असता, त्यांनी याविषयी भाष्य करणे टाळले.

( हेही वाचा : कोकणच्या राजाचे मुंबईत आगमन! आंब्याच्या पहिल्या पेटीला ४२ हजारांचा भाव )

वीर सावरकरांचे तैलचित्र कर्नाटक विधानसभेत लावण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाने आंदोलन सुरू केले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून थयथयाटही केला. एकीकडे महाराष्ट्रात महापुरुषांच्या अवमानावरून मोर्चा काढणाऱ्या महाविकास आघाडीला कर्नाटक काँग्रेसच्या या भूमिकेविषयी विचारले असता, उद्धव सेनेसह सर्वच घटक पक्षांनी बोलण्यास असमर्थता दर्शवली. विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार मनीषा कायंदे यांनीही या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला.

काँग्रेसला दाऊद इब्राहिमचा फोटो लावायचाय का?

काँग्रेसच्या या वर्तनावर भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खोचक टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, वैचारिक मतभेद असू शकतात, पण सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते. सिद्धरामय्या यांना विचारा, त्यांना विधिमंडळात दाऊद इब्राहिमचे तैलचित्र लावायचे आहे का, असा खोचक सवालही त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.