नवीन वर्षात 1000 रुपयांची नवी नोट येईल आणि 2000 च्या नोटांवर बंदी येणार आहे, असा मेसेज तुम्हालाही सोशल मीडियावर आला आहे का? जर आला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
2018-19 नंतर 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी कोणताही नवीन पत्र देण्यात आले नसल्याची माहिती केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती. असे असतानाही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये 1 जानेवारी 2023 पासून 1000 रुपयांच्या नोटा परत येत असल्याचा दावा केला जात आहे. यासह या दाव्यात असेही म्हटले आहे की, 2000 रुपयांच्या नोटाही बँकेत परत येणार आहे. पण हा दावा किती खरा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या…
व्हिडिओमध्ये केला जाणारा दावा खोटा
2000 रुपयांच्या नोटा बंद करून 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीच्या काळात 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्याच्या जागी आरबीआयने 2000 रुपयांची नवी नोट जारी केली होती. त्यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये केला जाणारा खोटा असल्याचे PIB ने म्हटले आहे.
(हेही वाचा – पुन्हा होणार नोटबंदी! भाजप खासदाराने का केली २ हजारांची नोट बंद करण्याची मागणी?)