एखाद्याला पैसे देण्यासाठी जर तुम्ही चेकचा वापर करत असाल तर अनेक गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा तुमचा चेक बाऊन्स झाल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. काही प्रकरणांमध्ये तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. जेव्हा बॅंक काही कारणास्तव चेक नाकारते तेव्हा तुमचा चेक बाऊन्स मानला जातो. त्यामुळे चेक पेमेंट करताना काही गोष्टींबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
( हेही वाचा : कोकणच्या राजाचे मुंबईत आगमन! आंब्याच्या पहिल्या पेटीला ४२ हजारांचा भाव )
चेक बाऊन्स होण्याची कारणे; काय काळजी घ्याल?
- बॅंके खात्यातील अपुऱ्या निधीमुळे तुमचा चेक बाऊन्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे चेकवर रक्कम नमूद करताना आपला बॅंक बॅलन्स जरूर तपासून घ्या.
- स्वाक्षरी/सही करताना काळजी घेणे आवश्यक आहे. बॅंकेतील आणि चेकवरील स्वाक्षरी वेगळी असल्यास चेक बाऊन्स होतो.
- चेक तारखेसह जारी करा.
- शब्द आणि आकड्यांमधील एकसमानता नसणे किंवा रक्कम खोडलेली असणे.
- फाटलेला चेक बॅंका स्वीकारत नाही.
- ओव्हरड्राफ्टची मर्यादा ओलांडणे.
- चेक बाऊन्स झाल्यावर पाठवली जाते नोटीस
- चेक बाऊन्स झाल्यावर चेक देणाऱ्या व्यक्तीला त्याची माहिती दिली जाते. १ महिन्याच्या आत पैसे संबंधित व्यक्तीला दिले नाही तर कायदेशीर नोटीस पाठवली जाते. त्यानंतर १५ दिवस प्रतिसाद न मिळाल्यास निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्ट १८८१ च्या कलम १३८ नुसार संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
- जेव्हा तुम्ही बॅंकेच्या चेकद्वारे एखाद्याला पैसे देता तेव्हा चेक नंबर, खात्याचे नाव, रक्कम आणि तारीख यांसारखे चेकचे डिटेल्स लक्षात ठेवा.
- चेकवरील माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरा.