मुंबईत राज्यातूनच नव्हे तर देशभरातील नागरिक नोकरी-धंद्यासाठी येतात. स्थलांतरित समुदायामुळे मुंबईची लोकसंख्या वाढत असल्याचे याआधीही अनेक अभ्यासाअंती समोर आले आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईत दर दिवसाला सरासरी ३३३ नवजात बालके जन्माला येत असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली.
( हेही वाचा : बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर काय परिणाम होणार? २०० पक्ष्यांना एकाचवेळी रेडिओ कॉलरिंग )
यंदा वाढत्या गोवरच्या केसेसमध्ये ६० टक्क्यांहून अधिक बालके ही स्थलांतरित समुदायाची असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणातून दिसून आले. कोरोनामुळे स्थलांतरित समुदाय मोठ्या संख्येने आपापल्या मूळ गावी परतला होता. परंतु आता बिहार आणि उत्तर प्रदेशातून येणा-या स्थलांतरित समुदायांतील बराचशा लोकांनी आता मुंबईत परतण्यास सुरुवात केली आहे. ही बालके गोवर प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित राहिली आहेत. या दोन वर्षांच्या काळात मुंबई १ लाख २० हजार मुले जन्माला आली आहेत. कोरोनाचा काळ वगळला तर दर वर्षाला मुंबईत १ लाख ४५ हजार बालके जन्माला येतात. दोन वर्षांत २५ हजार बालकांचा जन्म हा स्थलांतरीत समुदायाच्या मूळ गावी झाला. या दोन्ही संख्येतील फरक पाहिला तरीही मुंबईत सरासरी ३३३ नवजात बालके जन्माला येतात, अशी माहिती पालिका अधिका-यांनी दिली. ही संख्या ध्यानात घेत बांधकाम तसेच रसत्यावर राहणा-या स्थलांतरित समुदायातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध सुरु असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community