मालाडमध्ये मलवाहिनी टाकण्याच्या कामांमध्ये मविआकडून आडकाठी : भाजप नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

178

मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथील एसबीआय बँक ते संतोष माता मंदिर पर्यंतच्या नवीन मलनि:सारण वाहिनी टाकण्याच्या कामांमध्ये शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून खो घातला आहे. या दोन्ही पक्षांच्यावतीने जाणीवपूर्वक कंत्राटदाराला त्रास देत हे काम बंद पाडले जात असून परिणामी या पायाभूत सेवा सुविधांपासून स्थानिक वंचित राहत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून कामांमध्ये अडथळा आणून केल्या जाणाऱ्या विलंबाचा निषेध म्हणून भाजपच्या स्थानिक नगरसेवकाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंगळवारी २० डिसेंबर रोजी मालाडमधील रमेश हॉटेल समोर, टॅक्सी स्टँडजवळ एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा विनोद मिश्रा यांनी दिला आहे.

( हेही वाचा : बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर काय परिणाम होणार? २०० पक्ष्यांना एकाचवेळी रेडिओ कॉलरिंग )

मालाड (पूर्व), कुरार व्हीलेज, एस.बी.आय. बैंक ते संतोषी माता मंदिर पर्यंत नवीन मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे कामा मध्ये वारंवार राजकीय पक्ष तसेच महाननगरपालिकेच्यावतीने अडथडा निर्माण करून लोकांचा हिताचे काम बंद करणाऱ्या राजनेता आणि अधिकाऱ्यांचा विरोधात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा भाजपा पक्षनेते नगरसेवक विनोद मिश्रा यांनी सहाय्यक आयुक्त पी / उत्तर विभाग यांना लेखी पत्राद्वारे दिले आहे. तसेच त्याची प्रत महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना दिलेली आहे.

दिंडोशीतील प्रभाग क्र.- ४३ मधील एस.बी. आय. बँक ते संतोषी माता मंदिर पर्यंत नवीन मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम २०१९ मध्ये स्थानिक नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या प्रयत्नाने महानगरपालिकेतर्फे चालू करण्यात आले होते. परंतु काम चालू झाल्यानंतर विविध राजकिय पक्ष जसे की शिवसेना ( उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉग्रेस, काँग्रेस तर्फे काम बंद करण्यात आले. पुन्हा काम चालू करण्याकरीता महापालिका, राजकीय पक्ष आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत नर्मदा हॉलमध्ये चर्चा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा काम चालू करण्यात आले. पण मान्सूनमुळे परत काम बंद करण्यात आले. मान्सून संपल्याने ठेकेदारानी उर्वरित काम चालू करण्याचे सांगितले. यासाठी सर्व परवानगी घेण्यात आली.

त्यानंतर १६ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजता मलनिःसारण वाहिनी टाकण्याच्या कामाला पुन्हा सुरूवात करण्यात आले. पण काम चालू केल्यानंतर पुन्हा शिवसेना (उध्दव ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉंग्रेस यांचाकडून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारस काम करण्यास मनाई केली व कामही बंद केले,असा आरोप विनोद मिश्रा यांनी केला.

लोकांचे हिताचे काम शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्षातर्फे बंद करण्यात आल्याने मंगळवारी २०डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता काम बंद करणाऱ्या या पक्ष व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा विरोधात रमेश हॉटेल समोर, टॅक्सी स्टँड जवळ एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा पत्राद्वारे विनोद मिश्रा यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.