ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना ठाणे सत्र न्यायालयाकडून अटक वाॅरंट जारी करण्यात आले आहे. 2015 साली बेकायदा गाळ्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईदरम्यान माळवी यांनी सुभाष ठोंबरे यांना मारहाण केल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. याप्रकरणी 2018 साली गु्न्हा नोंद झाल्यानंतर, तसेच त्यावर चार्जशीट दाखल झाल्यानंतर न्यायालयाने समन्स पाठवून हजर न झाल्याने हा अटक वाॅरंट जारी करण्यात आल्याचे समजते.
गैरवर्तणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद
2015 सालीच्या ठाणे महानगरपालिकेतील वर्धापनदिनी देण्यात आलेले पुरस्कार चुकीच्या व्यक्तींना दिला असल्याचा आरोप सुभाष ठोंबरे यांनी केला होता. याच प्रकरणाची माहिती घेत असताना संदीप माळवी यांनी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी 2018 साली गुन्हा नोंद करण्यात आला. तर संदीप साळवी यांनी देखील 2015 साली सुभाष ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. संदीप माळवी यांच्यासोबत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अविनाश रणखांब आणि इतर 5 जणांचे देखील अटक वाॅरंट जारी करण्यात आले. तक्रारदार संदीप माळवी आणि तक्रारदार सुभाष ठोंबरे यांनी एकमेकांविरोधात गुन्हा नोंद केल्याने न्यायालय या प्रकरणावर निर्णय देणार आहे.
( हेही वाचा: ‘KOO’ चे ट्वीटरला आव्हान; CEO म्हणाले, बौद्धिक हत्येपासून स्वत:ला वाचवा )
यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी
काही वर्षांपूर्वी बेकायदा गाळ्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईदरम्यान माळवी यांनी सुभाष ठोंबरे यांना मारहाण केल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु असून, न्यायमूर्तींनी संदीप माळवी, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्यासह अन्य पाच जणांवर अटक वाॅरंट जारी करण्याचे आदेश नौपाडा पोलिसांना दिले आहेत.
Join Our WhatsApp Community