आता TV पाहणा-यांचा खिसा रिकामा होणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापासून म्हणजे फेब्रुवारी 2023 पासून टीव्ही चॅनेल्सचे दर महागणार आहेत. टीव्ही चॅनल्सचे दर साधारणत: 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे आता टीव्ही पाहायची असेल तर, तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
ग्राहकांना फटका
जवळपास तीन वर्षांनंतर टीव्ही चॅनेल्सने दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायने (TRAI) आपल्या बेस कॅपमध्ये बदल करत, किंमत 12 रुपये वरुन 19 रुपये केली आहे. याचाच फायदा घेत वाहिन्यांनी आपले दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील महत्त्वाच्या वाहिन्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या खासगी इंटरटेनमेंट वाहिन्या जसे की, झी टीव्ही , कलर्स, स्टार आणि सोनी या वाहिन्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या वाहिन्यांनी आता ट्रायच्या नियमांनुसार दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. कारण की, त्यांच्या Monthly Subscription चा दर वाढणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना 10 ते 15 टक्के जास्त पैसे टीव्ही पाहण्यासाठी मोजावे लागणार आहेत.
( हेही वाचा: ठाणे खाडीतून जाणार बुलेट ट्रेन; पर्यावरणाचा -हास होणार का, वाचा अहवालात काय? )
Join Our WhatsApp Community