यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 10 प्रवासी जखमी

176

यमुना एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा दाट धुक्यामुळे अपघात झाला आहे. 20 डिसेंबर रोजी यमुना द्रुतगती मार्गावर गलगोटियास विद्यापीठासमोर एका वेगवान बसने पाठीमागून कंटेनरला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. दनकौर कोतवाली परिसरात हा अपघात झाला.

बस 15 फूटावरुन खाली कोसळली

गौतम बुद्ध नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे 20 डिसेंबर रोजी आग्रा-नोएडा यमुना एक्स्प्रेसवेवर पेरिफेरल आणि गलगोटिया दरम्यान दानकौर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक प्रवासी बस एका कंटेनरला धडकली. त्यानंतर बस अनियंत्रित होऊन 15 फूट खाली कोसळली. यावेळी बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते. या अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरड सुरु झाली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, 10 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधीही 18 डिसेंबरच्या सकाळी नोएडा-ग्रेटर एक्स्प्रेसवेवर एक भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले आहेत.

( हेही वाचा: बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर काय परिणाम होणार? २०० पक्ष्यांना एकाचवेळी रेडिओ कॉलरिंग )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.