जम्मू-काश्मिरमधील शोपियानच्या मुंझ भागात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या भागात अजूनही चकमक सुरू असून, सुरक्षादल ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवत असल्याची माहिती कश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे.
शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांसह सुरक्षा दलाच्या पथकाने तपास मोहीम सुरू केली. सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम तीव्र केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीदेखील दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील वाथू शिरमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. यावेळी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा जवानांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली होती.
( हेही वाचा: ‘शौर्य, पराक्रम आणि विजयी भव’ INS मोरमुगाओची खास वैशिष्ट्य! ‘या’ शहरावरून केले युद्धनौकेचे नामकरण )
दोन दहशतवाद्यांची ओळख पटली
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या तीन स्थानिक दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. या दहशतवाद्यांपैकी एक शोपियानचा लतीफ लोन आहे, जो कश्मीरी पंडित पूरण कृष्ण भट यांच्या हत्येमध्ये सामील होता. तर दुसरा दहशतवादी अनंतनागिनचा उमर नजीर असून तो नेपाळच्या तिल बहादूर थापा यांच्या हत्येत सहभागी होता. या दहशतवाद्यांकडून एक AK 47 रायफल आणि दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. मात्र, तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
Join Our WhatsApp Community