राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज, मंगळवारी जाहीर झाला आहे. विविध पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. अशातच भाजपच्या नेत्या आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपची सरशी झाल्याचा दावा केला आहे. बीड जिल्ह्यात या विजयाचे त्यांनी पेढे देखील वाटले.
(हेही वाचा – ग्रामपंचायत निकालाबाबत फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले ‘रेकॉर्डब्रेक जागा…’)
या विजयाच्या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केले आहे. यावेळी त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले की, ग्रामपंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी…अभिनंदन आमच्या कार्यकर्त्यांचे… तर ग्रामपंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे. मात्र परळी विधानसभा मतदार संघात त्यांची पिछेहाट झाल्याच दिसून येत आहे. परळी विधानसभा मतदार संघात धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसून येत आहे.
ग्राम पंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी…अभिनंदन आमच्या कार्यकर्त्यांचे…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 20, 2022
धनंजय मुंडेंच्या कार्यालयात विजयाची तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांच्या स्वागतीसाठी स्टेज करण्यात आले आहे. तसेच कार्यकर्ते आपला आनंद मोठ्या प्रमाणावर व्यक्त करताना दिसताय. मतदार संघातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत तर काही आघाडीवर असल्याचे प्राथमिक फेरीत दिसून येत आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी ट्विट करून भाजपच्या सरशीच्या दाव्यावर ते म्हणाले की, पंकजा यांचं ट्विट किती वेळ टिकेल हे कळेलच.
Join Our WhatsApp Community