सांगलीत राष्ट्रवादीला दणका! ‘भाजप’च्या गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री बनल्या सरपंच!

143

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. तर राष्ट्रवादीला दणका बसला आहे. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदावर विजयी झाल्या आहेत. निवडणूक लागल्यावर पडळकरवाडी गावामध्ये आधी हिराबाई पडळकर यांना बिनविरोध सरपंच करण्याचा ठराव केला होता. परंतु निवडणुकांमध्ये चुरशीची लढत असल्याने पडळकरवाडीत सरपंच पदासाठी देखील निवडणूक लागली होती. यामध्ये हिराबाई पडळकर या ३०० मतांनी विजयी झाल्यात.

(हेही वाचा – बीड जिल्ह्यात ‘भाजप’ची सरशी, पंकजा मुंडेंचा दावा; ट्विटकरून कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन)

पडळकरवाडीत प्रमुख कार्यकर्ते, नेत्यांची नोव्हेंबरमध्ये एक बैठक झाली होती. ज्यामध्ये आमदार पडळकरांच्या मातोश्री हिराबाई पडळकर यांची बिनविरोध संरपंच म्हणून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण तालुक्यातील निवडणुका चुरशीच्या बनल्याने पडळकरवाडीतही सरपंच पदासाठी निवडणूक लागली आणि त्यांचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे.

गोपीचंद पडळकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच भाजपचे स्टार प्रचारक देखील आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांना विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे पडळकरवाडी ग्रामपंचायतीवरही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आल्याचे दिसतेय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.