राज ठाकरेंनी गडकरींशी फोनवरून साधला संवाद अन् म्हणाले, ‘आता तुम्हीच…’

147

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरेंनी पक्ष संघटनेसह कोकणातील समस्या देखील जाणून घेतल्या तसेच त्या सोडवण्याचे आश्वासनही जनतेला दिले. या दौऱ्याबाबत बोलत असताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा उल्लेख केला. तसेच या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोन करून संवाद साधला असल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. ते मुंबईत बोलत होते.

काय म्हणाले राज ठाकरे

मी नुकताच कोकण दौरा केला. मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थिती पाहिली. त्यानंतर नितीन गडकरी यांना फोन केला आणि माहिती दिली. जर समृद्धी महामार्गासारखा ७०० किमी लांबीचा महामार्ग इतक्या कमी वेळात होऊ शकतो. मग मुंबई-गोवा महामार्ग १६ वर्ष होऊनही पूर्ण का झालेला नाही? गडकरींनी याबद्दल सविस्तर माहिती मला दिली. पण जनतेला या सबबी देता येत नाहीत. आता तुम्हीच वैयक्तिकरित्या यामध्ये लक्ष घालून काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल ते बघा, असे गडकरींना सांगितले आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा – बीड जिल्ह्यात ‘भाजप’ची सरशी, पंकजा मुंडेंचा दावा; ट्विटकरून कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन)

राज ठाकरेंच्या फोननंतर गडकरींनी तातडीने लक्ष घालून येत्या आठवड्याभरात काय करता येईल ते बघतो आणि कळवतो, असे आश्वासन दिले. यासोबतच या महामार्गाबाबत देवेंद्र फडणवीसांशीही बोलणे झालेले असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.