गालबोट! ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर तुफान राडा; दगडफेकीत 25 वर्षीय भाजप कार्यकर्ता ठार

130

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर एकीकडे सर्व राज्यभरात एकच जल्लोष सुरू आहे. दुसरीकडे जळगावात या निकालानंतर गालबोट लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपापसात भिडले. निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले आणि दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. यावेळी तुफान दगडफेक देखील करण्यात आली. या झालेल्या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या धनराज माळी नावाच्या २५ वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या वेळी घडली आहे.

(हेही वाचा – राज ठाकरेंनी गडकरींशी फोनवरून साधला संवाद अन् म्हणाले, ‘आता तुम्हीच…’)

जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक सुरू केली. यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहे. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झालेत. त्यातील भाजपचा धनराज माळी गंभीर जखमी झाला. कार्यकर्त्यांनी या जखमी कार्यकर्त्याला तत्काळ सरकारी रूग्णालयात दाखल केले होते.

या घटनेनंतर जामनेरच्या उपजिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी व प्रचंड आक्रोश सुरू होता. टाकळी ग्रामपंचायतीत भाजप विरूद्ध भाजप अशी लढत होती. निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. हाणामारीत झालेल्या दगडफेकीत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावात खळबळ माजली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.