ए लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत नरेंद्र मोदींचा मोठ्या प्रमाणात विरोध करुन स्वतःच्या पक्षाला १० वर्षे मागे नेणारे राज ठाकरे आपल्याला आठवतात. हा काळ राज ठाकरेंसाठी कठीण काळ होता. शरद पवारांनीच जणू मोदींवर टीका करायला सांगितलीय अशाप्रकारे राज ठाकरे मोदींवर टीका करत होते. परंतु त्या काळात “लाव रे तो व्हिडिओ” हा त्यांचा डायलॉग खूप गाजला होता. हा डायलॉग आता सुषमा अंधारे यांना लागू पडतोय.
( हेही वाचा : कर लो दुनिया मुठ्ठी में! रिलायन्स ग्रूप ’इंडिपेंडेंस’ ब्रॅंड अंतर्गत विकणार प्रोसेस्ड फूड )
सुषमा अंधारे राजकारणात आपलं नशीब आजमवत आहेत. राष्ट्रवादीत डाळ शिजली नाही म्हणून त्यांनी शिवसेनेत म्हणजेच ठाकरे गटात प्रवेश केला. एखाद्या मायावी राक्षसाने आपले रुप बदलावे त्याप्रकारे बाईंनी आपले विचार सहज आणि झटक्यात बदलले. हिंदूद्रोही असताना राष्ट्रवादीतून ठाकरे गटात टुणकन उडी मारली आणि काय चमकार! त्या अचानक हिंदुत्ववादी झाल्या. इतकेच होऊन थांबल्या असत्या तर त्या अंधारे बाई कसल्या? त्यांनी हिंदुत्ववाद्यांना हिंदुत्वाचे डोस पाजायला सुरुवात केली.
मग हिंदुत्ववादी मंडळींनी ठरवलं. आम्ही कोणत्याही आमिषाशिवाय, पदाशिवाय, पैशांशिवाय हिंदुत्वाचा झेंडा हातात घेऊन चालत आहोत आणि ही स्त्री हिंदूंचा अपमान करुन हिंदुंनाच हिंदुत्वाचे डोस पाजतेय. मग हिंदुंना राज ठाकरेंचा तो डायलॉग आठवला, “लाव रे तो व्हिडिओ” आणि त्यानंतर सुषमा अंधारेंचे जुने व्हिडिओ बाहेर येऊ लागले. त्यात सर्वांना कळलं की आज हिंदुंनाच हिंदुत्वाचे डोस पाजणार्या सुषमा अंधारे ह्या पराकोटीच्या हिंदू द्वेष्ट्या आहेत. संत ज्ञानेश्वरांसारख्या कोमल, माऊलीचे ह्रदय असणार्या महापुरुषावर ह्या बाईने गलिच्छ टीका केली. देवीवर टीका केली आणि इतकं सगळं करुन माझ्या मागे ईडी लावता येत नाही म्हणून सीडी लावली.
बरं लावली सीडी. पण ती खोटी नसून खरी आहे. ही विधाने सुषमा अंधारे यांची आहेत. त्यात हिंदुंनी कोणतीही लबाडी केली नाही. वारकर्यांसारख्या सभ्य नि सज्जन लोकांना रोष खोटा नाही. सुषमा अंधारे आता हिंदुत्ववादी होण्याचा ढोंग करत आहेत. पण त्यांची भूतकाळातली कर्म त्यांच्या आकांक्षेवर डोईजड झाली. सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा दारुण पराभव होणार असा निश्चय हिंदुंनी केला आहे. दुःख या गोष्टीचं वाटतं की हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे ह्यांनी हिंदूंचा द्वेष करणार्या सुषमा अंधारे यांना ठाकरे गटात सामील तरी कसं करुन घेतलं? एकदाही तीर्थरुपांची आठवण झाली नाही का?
Join Our WhatsApp Community