नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असताना, अचानक ध्वनीक्षेपकात बिघाड झाल्यामुळे विधिमंडळाचे कामकाज थांबवावे लागले. त्यामुळे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
विधिमंडळाच्या कामकाजावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. विधिमंडळ सदस्य आपला अमूल्य वेळ कामकाजासाठी देत असतात. राज्यातील जनतेचे लक्ष कामकाजाकडे लागलेले असते. कामकाजातील प्रत्येक मिनिट महत्वाचे असते. विधिमंडळाचा वेळ वाया जावू नये म्हणून विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करत असताना, ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद पडल्याने सभागृहाचं कामकाज थांबवावं लागणं योग्य नाही, असे अजित पवार म्हणाले.
हे सरकारचे अपयश!
ज्या यंत्रणेवर ही जबाबदारी आहे, ती यंत्रणा आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरली आहे. ध्वनीक्षेपक यंत्रणा वारंवार बंद पडणे आणि त्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबवावे लागणे, हे सरकारचेही अपयश असून मी या प्रकाराचा निषेध करतो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community